बीड दि.7 जानेवारी – बीड मध्ये जुगार अड्यावर पडलेल्या छाप्यात पकडलेल्या अन गुन्हा दाखल झालेल्या, 5 शिक्षकांना जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार (Ajit Pawar) यांनी निलंबित (Suspended) केले आहे. या शिलंबित शिक्षकापैकी 3 जण जिल्हा परिषदेचे तर 2 जण खाजगी संस्थेचे शिक्षक आहेत.
(Blow to ‘those’ five gambling teachers; Suspended action.)
दि.28 डिसेंबर रोजी बीड (Beed) शहरालगत एका जुगार अड्ड्यावर अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी छापा टाकला होता. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजप जिल्हाध्यक्षासह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या 5 शिक्षकांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन दिवसापूर्वी जि.प.प्रशासनाने या शिक्षकांची (gambling teachers) माहिती मागवून घेतली होती. त्यानंतर काल (दि.6) गुरुवारी उशिरा या पाचही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीआहे.
यात हरिदास जनार्धन घोगरे रा.नंदनवन कॉलनी बीड, भगवान आश्रुबा पवार,रा.काळेगाव हवेली ता.बीड, भास्कर विठ्ठल जायभाय रा. काकडहिरा ता.पाटोदा, अशोक रामचंद्र सानप, रा.कालिकानगर बीड, बंडू किसन काळे रा.कालिकानगर बीड अशी निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. दरम्यान या कारवाईने शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.