बीड दि.19 डिसेंबर – नगर पंचायत निवडणूकीच्या (Nagar Panchayat election) निमित्ताने बीड (Beed) जिल्ह्यात पुन्हा एकदा भावा विरुद्ध बहिण संघर्ष तापू लागला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर वडवणी नगर पंचायतमध्ये भाजपाचे (BJP) बापलेका विरुध्द राष्ट्रवादीचे (NCP) काका पुतणे असा संघर्ष दिसून येत आहे.
(Brothers and sisters in Beed district and uncle Putne against Baplek in Wadwani …)
येत्या 21 डिसेंबर रोजी नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि याचीच रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाऊ धनंजय मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे या दोघांमध्ये सामना रंगला आहे.
पाच वर्ष सत्तेत असताना तुम्ही ऊसतोड महामंडळासाठी काय केलं, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे आष्टी येथे झालेल्या सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकरी नुकसान भरपाई आणि पीक विम्यापासून वंचित असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
वडवणी नगरपंचायतसाठी काका-पुतण्यांची व बाप लेकाची प्रतिष्ठा पणाला..
वडवणी नगरपंचायतची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारात चांगलाच रंग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, आघाडी व भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांच्या वतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. राष्ट्रवादीचे नेते आ. प्रकाश सोळंके (Prakash Solanke) व त्यांचे पुतणे जयसिंग सोळंके (Jaysing Solanke) हे वडवणी नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी शहरात तळ ठोकून आहेत.
तर नगरपंचायत पुन्हा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे (Rajabhau Munde) व त्यांचा मुलगा बाबरी मुंडे (Babri Munde) यांनीही तगडे नियोजन केले आहे. काही झाले तरी ही नगरपंचायत आपल्या ताब्यातून जाऊ द्यायची नाही यासाठी पिता पुत्राचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यावरूनच नगरपंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे काका-पुतण्याने व भाजपच्या बाप -लेकाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे.