BEED24

BSNL tower accident बीएसएनएल टॉवर दुर्घटनेतील बालिकेचा मृत्यू; तर वीज पडून तरुण ठार.

किल्लेधारुर दि.11 मे – BSNL tower accident धारुर शहरातील संभाजीनगर झोपडपट्टी भागातील बीएसएनएल टॉवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना एका बालिकेचा मृत्यू झाला. तर घाटनांदूर ता. अंबाजोगाई येथे वीज पडून एक बावीस वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दि.11 मे शनिवारी किल्लेधारुर शहरात दुपारी चारनंतर अवकाळी पावसाने झोडपले. यावेळी सुसाट वादळी वारा व पावसाने संभाजी नगर झोपडपट्टी भागात जवळजवळ तीस वर्षापूर्वी बीएसएनएलकडून उभारण्यात आलेले एसटीडी टॉवर कोसळले. या दुर्घटनेत टॉवर जवळ राहणाऱ्या शिकलकरी समाजातील घरात बसलेल्या तीन बालिका व दोघे जण जखमी झाले. यात तीन बालिका गंभीर जखमी आहेत. जखमीनां येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करीन अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ रूमालयात हलवण्यात आले. या जखमी पैकी राधा कौर (8 वर्ष) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पुनम कौर (6 वर्ष), दस्मित कौर (5 वर्ष) यांना लातूर येथे हलवण्यात आले. जखमीत गंगा कौर (22 वर्ष) व योगिंदरसिंग (25 वर्ष) यांचा समावेश आहे. दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातही अवकाळीचा मोठा फटका बसला. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे रवि गोदाम या 22 वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला तर सोबत असलेला मित्र ओम लांडगे या जखमी झाल्याची घटना घडली.

Exit mobile version