BEED24

Car bike accident … भरधाव कारने दुचाकीला उडवले; धारुर तालुक्यातील चोरांबा येथील घटना.

किल्लेधारुर दि.19 सप्टेंबर – Car bike accident धारुर तालुक्यातील चोरांबा परिसरात आज दि.19 मंगळवारी भरधाव कारने दुचाकीला उडवून झालेल्या अपघातात Accident दोघे गंभीर जखमी झाले असून कारचालक फरार झाला आहे.

धारुर Dharur शहरापासून जवळच असलेल्या घाटपायथ्याला अरणवाडी व चोरांबा या गावात राष्ट्रीय महामार्ग क्र 548 सी या रस्त्यावर अपघाताची शृंखला सुरुच आहे. दि.8 सप्टेंबर रोजी अवघ्या काही तासात बसेसचे तीन तर एका दुचाकीस ट्रकने उडवल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असतानाच आज दि.19 रोजी चोरांबा येथील हॉटेल राधिका समोर धारुरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एका स्विफ्ट कारने (क्र. एमएच 08 एएन 2460) धारुरहून तेलगावकडे जात असलेल्या दुचाकीला (क्र. एमएच 44 एफ 2385) जोरात धडक दिली. अपघातात Accident दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून कारने विरुद्ध दिशेला जावून जोरात समोरासमोर धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला असून एअरबॕग उघडली आहे. कार चालक फरार झाला असून जखमींना स्थानिक ग्रामस्थांनी दवाखान्यात हलविले. जखमींची नावे मात्र कळू शकली नाहीत.

Exit mobile version