दिल्लीः दि.६ – ब्रिटनहून (UK) भारतात आलेल्या नवीन कोरोना स्ट्रेनचे (Strain) रुग्ण वाढले असून ही संख्या आता ७१ झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. यामुळे आता देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे.
देशात ब्रिटनहून (UK) आलेल्या प्रवाशांत नवीन कोरोना स्ट्रेन (Strain) आढळून येत आहे. हि संख्या २० वरुन आता ७१ झाली आहे. अशी माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली. या सर्व रुग्णांना आयसोलेट करण्यात आले असून आरोग्य यंत्रणा यावर लक्ष ठेवून आहे. याचा प्रसार होवू नये म्हणून सर्वोत्परी प्रयत्न केले जात आहे. विमानाने येणाऱ्या प्रवाशांचीही काळजी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खबरदारीचे उपाय सुचवले आहेत. आढळून आलेल्या ७१ रुग्णांच्या संपर्काचा शोध घेतला जात असून त्यांना कोरोंटाईन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.