बीड दि.25 मार्च – सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता असल्याचे भाकीत वर्तवले आहे. डख यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आजपासून तीन दिवस राज्यात पूर्व विदर्भात (Vidarbha) पाऊस पडणार आहे. तर 5 एप्रिल पासून महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात अवकाळी पावसाचा (heavy rain) अंदाज व्यक्त केला आहे.
( Chance of unseasonal rain again; Prediction of Punjab Rao Dakha. )
अक्कलकोट, देगलूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नागपूर (Nagpur) या भागात 25, 26 व 27 मार्च या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित राज्यात ढगाळ हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख (Punjab Rao Dakha) यांनी बांधला आहे. तसेच राज्यात 28, 29 आणि 30 मार्च रोजी हवामान कोरडे राहणार आहे. यानंतर पुन्हा एकदा 31 मार्च आणि एक एप्रिल 2023 रोजी पूर्व विदर्भात (Vidarbha) पाऊस पडणार आहे. यानंतर दोन एप्रिल ते पाच एप्रिल पर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे. या कालावधीमध्ये मात्र शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घेणे आवश्यक राहणार आहे.
पाच एप्रिल नंतर राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होणार आहे. 5 एप्रिल पासून राज्यातील हवामान मोठ्या प्रमाणात बदलेल आणि पुन्हा एकदा राज्यात मोठ्या अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता आहे. 5 एप्रिल, 6 एप्रिल आणि 7 एप्रिल रोजी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा राज्यात सर्वदूर पडणार असून मुसळधार स्वरूपाचा पाऊस (heavy rain) राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी दोन एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान शेतीची राहिलेली कामे पूर्ण करून घेणे गरजेचे राहणार आहे.