BEED24

तहसीलदारासह तलाठी व कोतवाल लाच स्विकारताना चतुर्भूज

वडवणीः दि.९ – अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाच स्विकारणे वडवणी (Wadvani) येथील तहसीलदारासह तलाठी, कोतवाल यांना चांगलेच महागात पडले. लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने लावलेल्या सापळ्यात हे तिघे अलगद सापडले असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वाळूचे ट्रॅक्टरच्या हप्ते देऊनही पुन्हा पुन्हा पैशाची मागणी तक्रारदार कडे करत असल्यामुळे आज बुधवार दिनांक 9 रोजी तक्रारदाराने वडवणीचे (Wadvani) तहसीलदार एस.डी. सांगळे, देवळा सज्जा तलाठी धुरजी कचरु शेजळ व कोतवाल बालाजी भिडवे याना ३५००० हजार रूपये तक्रारदाराने वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाच म्हणून दिले होते. याची सूचना अगोदरच तक्रारदाराने एसीबी (ACB) कडे केली होती. ठरल्याप्रमाणे एसीबी चे उप अधिक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या टीमने लाच घेताना संबंधित तिघांना रंगेहात पकडले. त्यांना पुढील चौकशीसाठी बीड ऑफिसला नेण्यात आले आहे.

Exit mobile version