नवी दिल्ली दि.22 एप्रिल – देशात दररोज कोरोना बाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. सोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचे आकडेही वाढले आहेत. लसीकरणाची मोहिम देखील देशात वेगाने सुरू आहे. अनेकांच्या मनात लसीबद्दल असलेली शंका आजच्या बातमीने दुर होणार आहे. केंद्र सरकारने याविषयी आकडेवारी जाहीर करत हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राने जाहीर केलेल्या या आकडेवारीनुसार कोरोनाविरुद्धची लस प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. तर महाराष्ट्रात आढळून आलेल्या डबल म्युटेंट व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिन लस अधिक प्रभावी असल्याचा निष्कर्ष इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मांडला आहे.
(Comfortable … Both vaccines against corona are effective; Covacin vaccine is a double mutant variant.)
भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु झाल्यानंतर आतापर्यंत 12.7 कोटी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमेत (Vaccination campaigns) आतापर्यंत एकूण 1.1 कोटी कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आलेत. कोव्हॅक्सिनचा पहिल्या डोस 93, 56, 437 जणांना दिल्यानंतर यातील 4 हजार 208 म्हणजेच 0.04 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. तर दुसऱ्या डोसनंतर देखील 0.04 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर येत आहे.
तर तिकडे कोव्हिशिल्ड लसीचे (Covishield vaccine) आतापर्यंत एकूण 11.6 कोटी डोस देण्यात आले आहेत. कोव्हिशिल्डचा पहिला डोस 10 कोटी 3 लाख 2 हजार 745 जणांना दिल्यानंतर यातील 17 हजार 145 म्हणजेच 0.02 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे, कोव्हिशिल्ड लसीचा (Covishield vaccine) दुसऱ्या डोस घेतल्यानंतर 0.03 टक्के जणांना कोरोना झाला आहे. कोव्हिशिल्डचा दुसरा डोस एकूण 1 कोटी 57 लाख 32 हजार 754 जणांना दिल्यानंतर यातील 5 हजार 14 जणांना कोरोना झाल्याचं समोर येत आहे.
दिलासादायक बाब ही आहे की लसीकरणानंतर (Vaccination campaigns) कोरोना होणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट होते आहे. त्यात लस टोचल्यानंतर कोरोना होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढावा हीच एक अपेक्षा या आकडेवारीवरुन समोर येत आहे.
कोरोनाची पहिली लाट (2020) आणि दुसरी लाट (2021) अशी वयाची वर्गवारी केल्यानंतर काही गटात रुग्णांची वाढ झाली आहे. वयोगट 10-20 वर्ष, 30-40 वर्ष, 40-50 वर्षात कोरोनाच्या रुग्णांची किंचित वाढ झाल्याचं समोर आलं आहे. तर 50-60 वर्ष आणि 60-70 वर्ष वयोगटात देखील दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली आहे. यात सर्वाधिक 30-40 वयोगटात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. ज्यात 2020 मध्ये 21.05 टक्के रुग्ण या वयोगटातील आढळून येत होते. तर आता 2021 मध्ये या वयोगटातील 21.15 टक्के रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे तिशी ते चाळीशीतील लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
देशात सध्याला 21.57 हून अधिक रुग्णांची संख्या बघायला मिळत आहे. ही संख्या मागील वर्षीच्या एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या डबल झाली आहे. देशातील 146 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 15 टक्क्यांहून अधिक आहे. जो राज्य आणि केंद्र सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. पहिल्या लाटेत एका दिवसात 94 हजार सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत रोजची वाढणारी रुग्णसंख्या 2.95 लाखांच्या घरात पोहोचली आहे.
कोव्हॅक्सिन लस डबल म्युटेंट व्हेरिएंट (Double Mutant Variant) वर जबरदस्त प्रभावी.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला विविध व्हेरिएंट्स जबाबदार आहेत. जवळपास 10 राज्यांत आढळलेला डबल म्युटेंट कोरोना सर्वाधिक घातक आहे. डबल म्युटेंट वेगाने पसरतो. तसेच खूप कमी वेळेत रुग्णाच्या आरोग्यावर प्रचंड आघात करतो.
एकीकडे कोरोनाचा झपाटय़ाने होत असलेला फैलाव, त्यात डबल म्युटेंटने हातपाय पसरल्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. याचदरम्यान इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मंगळवारी कोव्हॅक्सिन लसीबाबत दिलासादायी दावा केला. कोव्हॅक्सिन लस (Covacin vaccine) जबरदस्त प्रभावी असून कोरोनाचा डबल म्युटेंट व्हेरिएंटही (Double Mutant Variant) नष्ट करण्याची क्षमता या लसीमध्ये आहे, असे आयसीएमआरने (ICMR) म्हटले आहे. दरम्यान, कोविशिल्ड लसही प्रभावी असल्याचा दावा सिरम इन्स्टिटय़ूटने केला आहे.
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस ब्राझील, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंटवरही परिणामकारक आहे. ही लस सर्व व्हेरिएंटपासून रक्षण करते, असे आयसीएमआरच्या अभ्यासात आढळले आहे. अशा परिस्थितीत कोव्हॅक्सिन लस कोरोनाला संपवण्याच्या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.
क्लिनिकल ट्रायल्सच्या तिसऱया टप्प्यातील निष्कर्षानुसार, कोवॅक्सिन 81 टक्क्यांपर्यंत परिणामकारक सिद्ध झाली आहे. तिन्ही टप्प्यांमध्ये 27 हजार स्वयंसेवकांवर लसीचा प्रयोग करण्यात आला, असे भारत बायोटेकचे चेअरमन डॉ. कृष्णा एल्ला यांनी सांगितले.
कोवॅक्सिन लसीचे (Covacin vaccine) डोस वाया जाण्याचे प्रमाणही कमी आहे. ही लस वेरो सेल्सपासून बनवली आहे. तसेच ती 2 ते 8 अंश सेल्सिअसमध्ये स्थिर राहते आणि रेडी-टू-यूज लिक्विड फॉर्मेशनमध्ये तिची वाहतूक केली जाते. सध्याच्या पुरवठा साखळीसाठी हे फार उपयुक्त आहे.