BEED24

सरपंचाकडून विनयभंगाची तक्रार….

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) तालुक्यातील वाघोली गावच्या सरपंच व ग्रामसेवक वाद चांगलाच विकोपाला गेला असून धारुर पोलिस (Police) ठाण्यात परस्पर विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. काल दि.११ सोमवार रोजी सांयकाळी ७.२८ च्या सुमारास ग्रामसेविकेने वाघोली येथील सरपंच पतीच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर वाघोलीच्या सरपंचानी रात्री उशिरा ग्रामसेविकेचे पती व इतर दोघा विरुध्द विनयभंगाची तक्रार दिली असून तपास सपोनि सुरेखा धस करत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धारुर तालुक्यातील वाघोली येथील सरपंच व ग्रामसेविकेत सोमवारी वादविवाद झाला. वाद विकोपाला जात प्रकरण पोलिसापर्यंत गेले. यातून दोन्ही कडून परस्पर विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आल्या असून गुन्हे (Crime) नोंदवण्यात आले आहेत. यात ग्रामसेविका सुमित्रा पिता राजाभाऊ काचगुंडे यांनी दिलेल्या तक्रारी वरुन वाघोलीच्या सरपंच श्रीदेवी संजय आकुसकर यांचे पती संजय शिवमुर्ती आकुसकर यांच्यावर भादवि कलम ३५३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा (Crime) नोंदवण्यात आला. तर सरपंच श्रीदेवी संजय आकुसकर यांच्या फिर्यादी वरुन ग्रामसेविकेच्या पतीसह इतर दोघांवर ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. सरपंचानी दिलेल्या फिर्यादीत ग्रामसेविकेचे पती व इतर दोघांनी आडस ता. केज येथील त्यांच्या राहत्या घरासमोर सांयकाळी ६.३० च्या सुमारास येवून शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली व वाईट हेतूने हाताला धरुन विनयभंग केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलिस (Police) निरिक्षक सुरेखा धस या करत आहेत. सदरील प्रकाराची मात्र परिसरात चांगलीच चर्चा होत असून यातून आता काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

Exit mobile version