BEED24

बीड जिल्ह्यात कोरोनाने पार केला १० हजाराचा आकढा; २९१ मृत्यू

बीडः-३ आक्टोंबर- बीड (Beed) जिल्ह्याची आकडेवारी २ आक्टोंबर पर्यंत प्रशासनाने जाहिर केली असून यात १० हजार ४३६ कोरोना (corona) पॉझिटीव्ह आढळल्याची तर २९१ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

दि.२ आक्टोंबर २०२० शुक्रवार रोजी सांय.६ वाजता कोविड-१९ (covid-19) ची सद्यस्थिती प्रशासनाने जाहिर केली. जाहिर केल्याप्रमाणे जिल्ह्यात संशयित नमुन्याची एकुण १ लाख ४ हजार २५३ जनांची तपासणी करण्यात आली. यात ९३ हजार ८१७ नमुने निगेटिव्ह तर १० हजार ४३६ पॉझिटीव्ह आली आहेत. यातील जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या २८७ तर इतर जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४ अशा २९१ जनांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट १०.५ तर मृत्यूदर २.७५, डबलिंग रेट ४९.१ तर रिक्व्हरी रेट ७५.९० दाखवण्यात आला आहे. यात प्रत्येक रुग्णाचा कॉन्टॕक्ट ट्रेसिंग रेट २०.३४ असून यातून २ लाख १२ हजार ३४७ जनांचा शोध दर्शवला आहे. शुक्रवार दि.२ आक्टोंबर रोजी २२० रुग्णांची सुट्टी झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Exit mobile version