BEED24

बीड जिल्ह्यात कोरोना कहर; आज सातशे क्रॉस… धारुरमध्येही आढळले 29 रुग्ण.

बीड दि.6 एप्रिल- राज्यात कोरोनाचा उद्रेकात बीड जिल्हा मागे नाही. जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2237 प्राप्त अहवाला पैकी 716 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. आजचा कोरोना रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. 1521 जण निगेटिव्ह आली आहेत. आज तिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 131 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत.

जिल्ह्यात बीडनंतर दुसरे हॉटस्पॉट ठरलेल्या अंबाजोगाई तालुक्यात आज सर्वाधिक संख्या आहे. आज अंबाजोगाईत 161 तर आष्टीत 98 बाधित आढळली आहेत. धारुर तालुक्यात संख्या वाढून 29 तर केजमध्ये 64 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. परळी, पाटोदा व शिरुर तालुक्यातही रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली.

(Corona havoc in Beed district; Today seven hundred crosses … 29 patients were also found in Dharur.)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-131, अंबाजोगाई-161, आष्टी-98, धारुर-29, गेवराई-43, केज-64, माजलगाव-34, परळी-88, पाटोदा-31, शिरुर-31, वडवणी-6
अशी आहे.

सध्या कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात उद्रेक दिसून येत आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.6 मंगळवारी दुपारी आजची आकडेवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात बाधितांची संख्या आज सर्वाधिक 716 झाली आहे. बीड जिल्ह्यात काल पासुन कडक निर्बंध लावण्यात आलेली आहेत. दहा दिवसांच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा सर्व व्यवसाय ठप्प आहेत. कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात 47,288 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 30,57,885 वर पोहोचली आहे. राज्यात आज 26,252 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 25,49,075 वर पोहोचली आहे. राज्यात सोमवारी 155 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 56,033 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 4,51,375 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

Exit mobile version