BEED24

आज कोरोना रुग्ण आढळले….पहा किती व कोणत्या भागातील आहेत पॉझिटीव्ह रुग्ण

किल्लेधारूर दि.८(वार्ताहर) गेली दोन दिवस निरंक असलेली संख्या आज अंकात आली. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या ८ ॲन्टीजन (antigen) तपासणीत ३ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. काल एकही स्वॅब (Swab) पाठवण्यात आला नव्हता.

दोन दिवसांपासून पॉझिटीव्ह (positive) रुग्णांचा आकडा निरंक होता. आज मात्र कोरोना मीटर सुरु झाले आहे. आज कोविड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजन तपासण्यात आलेल्या ८ पैकी ३ जन पॉझिटीव्ह आढळले आहेत. काल स्वॅब (Swab) नव्हती मात्र आज ७ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ७० वर्षीय पुरुष, कोमटवार गल्ली, धारुर

२. ७० वर्षीय पुरुषा, कटघरपुरा, धारुर

३. १९ वर्षीय पुरुष, लक्ष्मी नगर, धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version