किल्लेधारूर दि.7 जून – येथील कोविड केअर सेंटरवर (Covid care center) आज एका साठ वर्षीय कोरोना बाधिताचा (Corona Positive) मृत्यू झाल्याची घटना घडली. कोविड केअर सेंटर सुरु झाल्यपासून जवळजवळ दिड वर्षातील ही पहिलीच घटना आहे.
(Corona suffocated to death at Dharur Covid Care Center; The first incident in a year and a half.)
सध्या संपुर्ण देशभर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातही मोठ्या संख्येने कोरोना बाधितांचा (corona positive) आकडा खालावला आहे. दुसऱ्या लाटेत बाधितांसह मृत्यूची (corona death) संख्या मोठी आहे. धारुर तालुक्यात एकुण 91 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासकीय पातळीवर आहे.
आज धारुर कोविड केअर सेंटरवर कोरोनाचा पहिला मृत्यू झाला. तालुक्यातील थेटेगव्हाण येथील एका साठ वर्षीय इसमाचा आरटीपीसिआर अहवाल आज पॉझिटीव्ह आला. सदरील इसमास कोविड सेंटरवर आणण्यात आले. मात्र येथे त्या कोरोना बाधिताचा मृत्यू (corona death) झाल्याची घटना घडली.
सदरील मृताच्या अंत्यसंस्कारासाठी प्रथम प्रशासनाकडून टोलवाटोलवी झाली. कुठलीही अधिकृत कोविड दफनभुमी शहरात नसल्याने नगर परिषदेसमोर पेच निर्माण झाला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या व पत्रकारांच्या प्रयत्नांतून शासनाच्या नवीन निर्देशानुसार नातेवाईकांकडे प्रेत सुपूर्द करण्यात आले.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांच्या प्रयत्नांतून सदरील इसमाचे पार्थिव नातेवाईकांकडे कोविड सेंटरचे डॉ. तफील तांबोळी व डॉ. आमोल दुबे यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले. शासनाचे सर्व कोविड नियमांचे पालन करुन पीपीई किट धारण करत थेटेगव्हाण येथे दफनविधी करण्यात आला. मात्र, प्रेत ताब्यात घेण्यापासून ते दफनविधीच्या अंतिम क्षणापर्यंत सदरील गावचे ग्रामसेवक उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी थेट मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे तक्रार केली.