बीड दि.8 एप्रिल – धारूर आणि पैठण येथील कुटुंबीयांचा विवाह सोहळा मांजरसुंबा येथे पार पडला. मात्र बोहल्यावर चढलेल्या नवरा-नवरी सह विवाह सोहळ्यासाठी (Wedding ceremony) उपस्थित असणाऱ्या 300 वऱ्हाडीवर नेकनूर पोलिसांनी (Police) कारवाईचा दणका देत गुन्हा नोंद केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
(Crime against 300 people, including Dharur’s bride; Violation of Disaster Management Act.)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांजरसुंबा येथील बीड रोड वर असणाऱ्या कन्हैया लॉन्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाली. माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी (Police) घटनास्थळाकडे धाव घेतली. या ठिकाणी धारूर येथील अमित अर्जुन गायकवाड आणि पैठण जिल्हा औरंगाबाद येथील ऋतुजा दिपकराव चव्हाण या दोघांचा विवाह सोहळा (Wedding ceremony) होत असल्याने गर्दी झाल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे (Disaster Management Act) उल्लंघन झाल्याने ग्रामसेवक जगदीश कडू यांच्या फिर्यादीवरून नवरा, नवरी त्यांचे आई-वडील, मामा, लग्न लावणारे ब्राह्मण, लॉन्सचे मॅनेजर यांच्यासह इतर तीनशे लोकांवर कलम 188, 269, 270 भा. द. वि. साथरोग आपत्ती व्यवस्थापन या कलमाखाली नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरिक्षक विलास जाधव, यांच्यासह पोलीस व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.