BEED24

आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर गुन्हा; महिलेने केली होती तक्रार.

बीड दि.24 जुलै – आष्टीचे आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांना जबर धक्का बसला असून आ. धस यांच्यासह 38 जणांवर गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी सुरेश धस यांच्याविरोधात ही कारवाई केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.

(Crime against 38 persons including MLA Suresh Dhas; The woman’s complaint.)

माधुरी मनोज चौधरी असं तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदार सुरेश धस यांच्या विरुद्ध निवडणुकीत उभे असल्याचा राग मनात धरून सुरेश धस आणि त्यांच्या समर्थकांनी हॉटेल आणि स्थानिक संपत्तीची तोडफोड केल्याचा आरोप माधुरी चौधरी यांनी केला आहे. माधुरी चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलिसात (Police) आमदार सुरेश धस यांच्यासह तब्बल 38 समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण.
2017 साली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक (election) लागली होती. या निवडणुकीत सुरेश धस यांच्या पॅनलच्या विरोधात पांढरी येथील माधुरी चौधरी ह्या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. याचाच राग मनात धरून सुरेश धस आणि त्यांचे समर्थक पती मनोज चौधरी यांच्यावर खोट्या तक्रारी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

थेट गृहमंत्र्याकडे तक्रार.
अनेक वेळा तक्रार देऊन देखील प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे सदर महिलेने थेट गृहमंत्री (Home minister) यांना पत्र लिहिले होते. दि.19 जुलैच्या रात्री सुरेश धस आणि त्यांचे समर्थक पांढरी येथे पोहोचले आणि पीडित महिलेच्या संपत्तीची तोडफोड केली अशी तक्रार महिलेने केली आहे. त्यानुसार, आष्टी पोलिसात (Police) आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांच्यासह तब्बल 38 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मात्र आ.सुरेश धस यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

Exit mobile version