किल्लेधारूर दि.११(वार्ताहर) तालुक्यातील खोडस येथे सरपंच पतीच्या विरोधात धारुर (Dharur) पोलिसात (Police) शिविगाळ करणे, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी देत कार्यालयीन कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा (Crime) ग्रामसेविकेच्या तक्रारी वरुन दि.११ सोमवार रोजी दाखल करण्यात आला.
फिर्यादी ग्रामसेविका सुमित्रा पिता राजाभाऊ काचगुंडे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, दि.११ रोजी खोडस येथे दुपारी १२.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात काम करत असताना आरोपी सरपंच पती संजय शिवमुर्ती आकुसकर यांनी येवून वाघोली येथील जि.प. शाळा व अंगणवाडीचे काम न केलेल्या नळ कनेक्शनचे ९६०० रुपयांच्या बिलाच्या चेकवर सही कर म्हणत दमदाटी, शिविगाळ करत तु एकटी गावात कशी येते पाहतो म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली व कार्यालयातील रजिस्टर फाडले व शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी धारुर (Dharur) पोलिस (Police) ठाण्यात भा.द.वि. कलम ३५३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा नोंद (Crime) करण्यात आला आहे.