BEED24

कळंबच्या व्यापाऱ्यावर परभणीत अत्याचाराचा गुन्हा….

परभणी दि.१ (प्रतिनिधी) चारचाकी वाहनात ओढत नेवून एका महिलेवर बलात्कार (Rape) केल्याच्या आरोपाखाली कळंब येथील प्रसिद्ध व्यापाऱ्यावर पिडीत महिलेने नवामोंढा पोलिस (Police) ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, वसमत रस्त्यावरील एमआयडीसी परिसरातून बुधवारी दुपारी जात असताना एका चारचाकी वाहनातील व्यक्तीने जबरदस्तीने वाहनात पिडितेला ओढून घेतले. यावेळी पिडितेने ओरड व विरोध केला असता वाहनाच्या चालकाने चाकू दाखवत धमकावले. तसेच वाहनातील अन्य व्यक्तीने जबरदस्तीने बलात्कार (Rape) केला, असे २६ वर्षीय पिडीत महिलेने नवामोंढा पोलिस (Police) ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला फौजदार भावसार या करीत आहेत. सदरील प्रकरणातील मुख्य आरोपी हा कळंब येथील प्रसिद्ध कापड व्यापारी आनंद बलाई असल्याची चर्चा असून पोलिस त्याचा तपास करीत आहेत.

Exit mobile version