BEED24

धारुर तालुक्यातील ‘त्या’ प्रकरणात खूनाचा गुन्हा; मित्राच्या साह्याने मामाच्या मुलीचा खून.

किल्लेधारूर दि.26 नोव्हेंबर -मित्राच्या साह्याने मामाच्या मुलीला विहिरीत ढकलून खून (Murder) केल्या प्रकरणी दिंद्रुड पोलिसात गुन्हा (Crime) नोंद झाला असून ही घटना धारूर (Dharur) तालुक्यातील कासारी येथील एका शेतात शुक्रवारी दुपारी एक वाजे दरम्यान घडली. यातील दोन्ही आरोपी फरार असून दिंद्रुड पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कासारी येथील साक्षी ज्ञानोबा कदम (वय 16 वर्षे ) तिच्या आत्याची मुलगी वैष्णवी मनोहर काळे हिच्या सोबत घरातून नवीन कपड्यांना शिलाई करण्यासाठी टेलर कडे जातोत म्हणून सकाळी दहा वाजता घरी सांगून गेल्या होत्या. दुपारी एक वाजे दरम्यान कदम यांच्या शेतातील विहिरी जवळ साक्षीचा चुलता रमेश कदम व आजी जनाबाई कदम हे काम करत असताना साक्षीला आरडाओरडा करताना पाहिले. भाची वैष्णवी व तिचा सोबत असलेला आकाश उर्फ लखन हे साक्षीला विहिरीत ढकलत होते. रमेश कदम विहिरीपर्यंत जाईपर्यंत त्या दोघांनी साक्षीला विहिरीत ढकलून तेथून पळ काढला. साक्षीची शोधाशोध केली असता विहिरीतून तिचा मृतदेह तब्बल चार तासांनी बाहेर काढण्यात आला. साक्षीची आते बहीण वैष्णवी मनोहर काळे व आकाश उर्फ लखन नागोराव तांबडे रा. पाडूळी ता. परळी यांनी खून केल्याची तक्रार रमेश कदम यांनी दिंद्रुड पोलीस (Police) ठाण्यात शुक्रवारी सांयकाळी दिली.


( Crime of murder in ‘that’ case in Dharur taluka; Murder of uncle’s daughter with the help of a friend. )

Exit mobile version