BEED24

मराठवाड्यातील या जिल्ह्यात घोंगावतोय अस्मानी संकट; पहा काय आहे हवामान खात्याचा अंदाज.

औरंगाबाद  दि.19 एप्रिल – महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या गुरुवारी दि.21 एप्रिल रोजी आणि शुक्रवारी दि.22 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस (heavy rains) पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यांचा समावेश आहे.

विदर्भ (Vidarbha), मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवार दि. 22 एप्रिल रोजी रायगडमध्ये हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या सरीं कोसळण्याची शक्यता आहे. मात्र पालघर, ठाणे, मुंबई येथे कोरडे वातावरण असेल.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. गुरुवार दि.21 रोजी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

शुक्रवारी अहमदनगर आणि पुणे येथे मेघगर्जनेसह पाऊस पडेल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर (Latur), उस्मानाबाद (Osmanabad), भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया येथे शुक्रवारीही मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यातील लातूर , उस्मानाबाद, नांदेड (Nanded) या जिल्ह्यात पुन्हा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.

( Crisis in this district of Marathwada; What is the weather department forecast. )

Exit mobile version