BEED24

परळीत वाघोबाचे दर्शन…. मालेवाडी शिवारात दहशत

परळीः दि.४(प्रतिनिधी) परळी (Parli) तालुक्यातील मालेवाडी गावात रात्री साडेनऊच्या सुमारास वाघ दिसल्याने ग्रामस्थांनी दहशतीत रात्र जागून काढली असून वन विभागाच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केल्याची माहिती मिळाली.

परळी (Parli) तालुक्यातील मालेवाडी शिवारात काल रात्री शेकोटी पेटवून बसलेल्या शेतकऱ्यांना अचानक वाघ (Leopard) दिसल्याची घटना रात्री ९.३० च्या सुमारास घडली. वालेवाडी हे गाव डोंगराळ भागात वसलेले आहे. कडाक्याची थंडी असल्याने काही जण शेकोटी पेटवून बसले असताना शेळ्यां बांधलेल्या ठिकाणाकडे वाघ जात असल्याचे आढळून आले. आरडाओरडा केल्यानंतर वाघ (Leopard) निघून गेला असून ग्रामस्थांनी रात्र जागून काढल्याचे सरपंच भुराजी बदने यांनी सांगितले. याबाबत वन विभागाला (Forest Department) माहिती देण्यात आली असून वन विभागाचे कर्मचारी प्राण्याच्या पायाचे ठसे घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळाली. मात्र सदरील प्राणी कोणता होता याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

Exit mobile version