बीड दि.7 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज गुरुवारी 1915 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 17 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1898 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्यात चिंतेची बाब म्हणजे कोरोना मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी 4 मृत्यूची नोंद झाली आहे.
(Deaths increased in Beed district; But a large decline in new corona bites; See what is the taluka wise situation.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-1, आष्टी-7, धारुर-0, गेवराई-1, केज-2, माजलगाव-1, परळी-1, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र कोरोना मृत्यूचे सत्र सुरुच आहे. बुधवारी दि.6 जिल्ह्यात कोरोना उपचार घेत असलेल्या चौघांनी जीव गमावला आहे. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या आता 2778 झाली आहे.
दरम्यान, राज्यात बुधवारी 2,876 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 65 लाख 67 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. राज्यात बुधवारी 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 929 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.