BEED24

धारुर शहरातील केज रोड परिसरात निर्जळी; नवरात्रीत पाण्यासाठी धावपळ

किल्लेधारूर दि.२१(प्रतिनिधी) केज रोड भागात आठ ते दहा दिवसापासून पाणी सोडण्यात आले नसल्याने दसऱ्याच्या सणांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली आहे. याबाबत मुख्याधिकारी नितीन बागूल यांच्याशी संपर्क केला असता लोकांची तक्रार आली असून दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती दिली.

धारूर शहरातील कसबा विभागातील केज रोड भागात आठ ते दहा दिवसापासून पाणी सोडण्यात आले नाही. दसऱ्याच्या सणांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली आहे. यापुर्वी पाईपलाईन फुटीचे कारण सांगून उडवाउडवी चे उत्तर देण्यात आले. या भागातील नागरीकांसह पत्रकार अतुल शिनगारे यांनी मुख्याधिकारी बागुल यांना सांगितल्यानंतर पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली. परंतू पाईपलाईन दुरुस्ती होवूनही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरीकांची तारांबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये मुख्याधिकाऱ्यांचे कर्मचारी ऐकत नाहीत अशी चर्चा होत आहे. याबाबत मुख्याधिकारी नितिन बागुल यांना विचारले असता नागरीकांच्या तक्रारीची दखल घेवून पाईपलाईन दुरुस्ती करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा पुर्ववत सुरु होणार असल्याची माहिती दिली.

Exit mobile version