BEED24

चिंताजनक… बीड जिल्ह्यात आढळला डेल्टा प्लसचा रुग्ण; मराठवाड्यात दोन रुग्ण.

बीड दि.9 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्ह्यात अद्याप कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग ओसरलेला नाही. असे असतानाच डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta plus variant) संशयित रुग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत 45 रुग्ण आढळले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे मराठवाड्यात औरंगाबाद (Aurangabad) व बीडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याचे एनआयव्हीला पाठविलेल्या संशयितांच्या सॅम्पल तपासणीत रविवारी (दि.8) आढळून आले आहे.

(Delta Plus patient found in Beed district; Two patients in Marathwada.)

राज्याच्या आरोग्य विभागाने कोविड विषाणूचे (Corona virus) जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (Genomic sequencing) राज्यातील 10 वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा आणि बीड व नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेचा समावेश केलेला आहे. या प्रयोगशाळांमधून डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविले जातात.

आरोग्य विभागाद्वारे या तपासणीचा अहवाल जाहीर केल्या जातो. राज्यातील 45 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून, जळगाव 13, रत्नागिरी 11, मुंबई 6, ठाणे 5, पुणे 3 आणि औरंगाबाद, बीड, पालघर, सिंधूदुर्ग, सांगली, कोल्हापूर, नंदूरबार या जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळल्याचे रविवारच्या (दि.8) अहवालात म्हटले आहे.

औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे (घाटी) एनआयव्हीला सॅम्पल्स पाठविलेले आहेत. या रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास, त्यांच्या आजाराचे स्वरुप, लसीकरण (vacccination) झालेले आहे का, आदी माहितीसह या रुग्णांच्या संपर्कातील कोणाला कोविड (Covid-19) सदृश्य लक्षणे असल्यास त्यांचे नमुने घेण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले आहेत. आतापर्यंत आढळलेल्या 45 रुग्णांपैकी 34 रुग्णांचीच माहिती आरोग्य यंत्रणेला प्राप्त झालेली असून, 11 रुग्णांचा शोध सुरू आहे.

डेल्टा प्लसच्या रुग्णांचे वयोगट
महाराष्ट्रात आढळलेल्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णात 18 वर्षांखालील 06 रुग्ण, 19 ते 45 वयोगटातील 20, 46 ते 60 वयोगटातील 14 तर 60 वर्षांवरील वयोगटाचे 05 असे एकुण 45 रुग्ण आढळलेले आहेत. यात 19 ते 45 वयोगटात सर्वाधिक 20 रुग्ण आहेत.

Exit mobile version