नवी दिल्ली दि.15 जून – कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) आता जगभरात पाय पसरत आहे. अनेक देशात डेल्टा व्हेरिएंटमुळे लॉकडाऊनच्या (lockdown) कडक नियमांची अंमलबजावणी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना वरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटची लागण होत असल्याच दिल्लीच्या एम्स रुग्णालयाच्या अभ्यासात समोर आलं आहे. तर भारतात डेल्टा व्हेरिएंट उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला असल्याचे समोर आले आहे.
(Delta variant concerns in six countries, including India; Lockdown again in many countries.)
डेल्टा व्हेरिएंटची (Delta variant) लागण झालेल्या अभ्यासात 63 लोकांचा समावेश होता. ज्यामध्ये हे संक्रमण आढळले आहे. यापैकी 36 रुग्णांना दोन डोस देण्यात आले, तर 27 जणांना लसीचा एक डोस दिला. भारतात पहिल्यांदा सापडलेल्या डेल्टा व्हेरिएंटवर जागतिक आरोग्य संघटनेन (WHO) चिंता व्यक्त केली आहे.
जगातील या सहा देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे संक्रमण.
1) कोविड 19 च्या डेल्टा प्रकाराचा शोध लागल्यानंतर झिम्बाब्वे सरकारने शनिवारी हुरंगवे आणि करीबा जिल्ह्यात दोन आठवड्यांचा स्थानिक लॉकडाऊनची घोषणा केली. गेल्या तीन दिवसांत 40 हून अधिक रुग्णांना लागण झाल्याचे सरकारने म्हटले आहे.
२) ब्रिटनमध्ये कोरोना डेल्टा व्हेरिएंट च्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे २१ जून नंतर लॉकडाउनचे (lockdown) निर्बंध वाढवण्याचे नियोजना आहे. आठवड्यात डेल्टा व्हेरिएंट रुग्णांमध्ये तीस हजारांनी वाढ झाली असल्याच पब्लिक हेल्थ इंग्लंडला आढळले आहे.
3) युरोप – डेल्टा व्हेरिएंट चे रुग्ण वाढू शकतात अस डब्ल्यूएचओच्या (WHO) युरोपच्या संचालकांनी म्हटल आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. डब्ल्यूएचओ डॉक्टर हंस क्लूगे म्हणाले की, डेल्टा प्रकारात काही लसी काम करत आहेत. 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक असुरक्षित आहेत.
4) फ्रान्स- कोविड-19 चा डेल्टा व्हेरिएंटचे रुग्णांची माहिती घेण्याच काम सुरु आहे. फ्रान्समध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण आहेत, विशेषत: दक्षिण-पश्चिम भागात आहेत. अस आरोग्यमंत्री ओलिवियर वेरन यांनी म्हटल आहे.
5) श्रीलंका- बेटांच्या देशांमध्येही डेल्टा व्हेरिएंटचे आढळला आहे. श्री जयवर्डेनपुरा विद्यापीठाच्या इम्यूनोलॉजी अणि आण्विक औषध विभागाच्या संचालिका डॉ. चंडीमा जीवनंदरा यांनी सांगितले की, क्वारंटाईन ठेवलेल्या एका रुग्णामध्ये हा व्हेरिएंट आढळला आहे. श्रीलंकेमध्ये एप्रिलपासून कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आणि मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे.
6) चीन- चीनमध्ये कोरोना डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण ग्वांगझोमध्ये 21 मे पासून 100 पेक्षा जास्त सापडली आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ग्वांगझोमधील रुग्ण डेल्टा व्हेरिएंट संसर्गमुळे वाढली आहेत.
डेल्टा प्रकार आधीच्या अल्फाच्या तुलनेत 100 पटीने अधिक पसरू शकतो. असा काही तज्ञांचा आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या ह्युमन इव्होल्युशनरी स्टडीजचे पीएचडी उमेदवार जोनाथन आर. गुडमन यांनी शनिवारी सांगितले की, पहिल्या आणि दुसर्या लसीच्या डोस दरम्यान कालावधी वाढविण्याच्या यूके सरकारच्या निर्णयामुळे लोकांना डेल्टा प्रकारात संसर्ग होण्याची शक्यता आहे.
भारतात नवा विषाणू डेल्टा प्लस.
भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या कोरोना विषाणू (Corona virus) उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे.
डेल्टा प्लस अर्थात एवाय.1 हा कोरोनाचा विषाणू (Corona virus) भारतात सध्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे त्याची धास्ती बाळगण्याचे कारण नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या नव्या प्रकारामुळे करोनाची लागण कितपत तीव्र असू शकते, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, हा प्रकार मोनोक्लोनल अँन्टिबॉडीज मिश्रण या कोरोनावरील उपचारांना दाद देत नाही. भारतामध्ये अलीकडे याच उपचारपद्धतीला मान्यता देण्यात आलेली आहे.
दिल्लीतील सीएसआयआर-इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (IGIB) संस्थेचे शास्त्रज्ञ यांनी रविवारी याबाबत ट्वीट केले आहे. कोरोनाना हा नवा विषाणू के 417 एन उत्परिवर्तनातून तयार झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
नवे उत्परिवर्तन हे सार्स-कोव्ही-2 च्या स्पाईक प्रोटीनमधील बदलाने झाले आहे. हे प्रथिन विषाणूला मानवी पेशीत शिरकाव करण्यासाठी मदत करते. ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’ने दिलेल्या माहितीनुसार, डेल्टामध्ये (बी.1.617.2) के 417 एन उत्परिवर्तन झालेले 63 जिनोम आतापर्यंत दिसून आले आहेत.