BEED24

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांना कोरोनाची Corona लागण झाली असून त्यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी Breach candy रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवार दि.२३ रोजी एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशा दिवशी थकवा आणि अस्वस्थता जाणवत असल्याने त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले होते.

Deputy Chief Minister Ajit Pawar infected with corona

याबाबत स्वतः अजित पवार Ajit Pawar यांनी ट्वीट केले आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह positive  आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधानतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,” असे अजित पवार Ajit Pawar यांनी म्हटले आहे.

Exit mobile version