BEED24

Dhananjay Munde मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा अपघात

सोलापूर दि.17 आक्टोंबर – राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा सोलापूर जवळ अपघात झाला असून यात त्या किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली.

याबाबत मिळालेली माहिती नुसार पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे पहाटे साडेचारच्या सुमारास बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडें यांच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बस यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. राजश्री मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी पोहोचून मदतकार्य केलं.

 

Exit mobile version