BEED24

धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या….

बीडः दि.१४- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर विरोधी पक्षाकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आघाडीचे नेते व राज्यात युवकांमध्ये वेगळी क्रेझ निर्माण केलेले धनंजय मुंडे गेल्या दोन दिवसांपुर्वी नात्यातील एका तरुणीच्या आरोपानंतर अडचणीत सापडले आहेत. भाजपाकडून या प्रकरणात मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा महिला आघाडीच्या चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनाम्याची मागणी केली असून यांच्या नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया देत चौकशीची मागणी केली आहे. भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना चक्रव्हूवात अडकवण्यासाठी विरोधी पक्ष सर्वोत्परी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान काल धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंडे यांच्या बद्दल एका कार्यक्रमात बोलताना राजकारणात आयुष्य उभं करायला खुप कष्ट घ्यावे लागतात, एखाद्या आरोपावरुन सत्यता न पडताळता एखाद्या निष्कर्षावर येणं योग्य नाही म्हणत मुंडे यांनी याबाबत खुलासा केला असून सत्य लवकरच समोर येईल अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान गेली दोन दिवस धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या समर्थनार्थ सोशल मेडियावर ‘आय सपोर्ट डीएम’ चा ट्रेंड पहायला मिळत आहे.

Exit mobile version