BEED24

ना. धनजंय मुंडे यांनी गर्जे, भापकर कुटूबियांचे पालकत्व स्विकारले…

आष्टी दि.२८(प्रतिनिधी) राज्यातील सर्व टीम नरभक्षक बिबट्याला (Leopard) पकडण्यासाठी आष्टीत (Ashti) पाचारण करणार असुन तो मिळाला नाही तर वन्यजीव विभागाची परवानगी घेऊन शुटरच्या माध्यमातून त्याला ठार मारण्याची परवानगी घेणार असल्याचे पालकमंत्री ना.धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितले. यावेळी सर्व ग्रामस्थांसमोर ना.मुंडे यांनी गर्जे व भापकर कुटूंबियांचे पालकत्व स्विकारत सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे जाहीर केले.

आष्टी (Ashti) तालुक्यातील सुर्डी व किन्ही येथील बिबट्याने (Leopard) केलेल्या हल्ल्यात दोघाचा जिव गेला. पिडित कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) शनिवारी आष्टी तालुक्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना, आष्टी (Ashti) तालुक्यातील बिबट्याची (Leopard) मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे. मी यावर बारकाईने लक्ष ठेऊन असुन याचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगाबाद, नागपुर येथील अधिकारी लोकांशी बोलणे झाले आहे. जर तो बिबट्या या टीमला मिळाला नाही तर रात्रीतुन राज्यातील सर्व टीमला पाचारण करून वन्यजीव विभागाची परवानगी घेऊन शुटरच्या माध्यमातून त्याचा खात्मा करण्याची परवानगी घेण्यासाठी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. लोकानी घाबरून जाऊ नये घराच्या बाहेर निघु नये असे त्यांनी सांगितले. सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गर्जे व स्वराज भापकर यांच्या कुटुंबियांचे पालकत्व ग्रामस्था समोर स्विकारले. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Aajbe), माजी आमदार साहेबराव दरेकर, जि.प. सभापती बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane), रामकृष्ण बांगर, सतिश शिंदे, आदि उपस्थित होते.

Exit mobile version