किल्लेधारूर दि.23 अॉक्टोंबर – धारुर (Dharur) तालुक्यातील गांजपूर येथील तानाजी संभाजी थोरात (वय 35) या ऊसतोड मजूराचा (Sugarcane laborers) विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. कर्नाटकात (Karnataka) बेळगी सहकारी साखर कारखान्यावर (Sugar factory) ऊसतोडणीसाठी पंधरा दिवसांपुर्वी गेलेल्या मजुराला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
(Dharur taluka laborer dies in Karnataka; Getting water from a well is life threatening.)
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, धारुर तालुक्यातील गांजपूर येथील तरुण तानाजी संभाजी थोरात वय 35 वर्ष हा बेळगाव जिल्ह्यातील बेळगी सहकारी साखर कारखान्यास ऊस तोडणीसाठी पंधरा दिवसा पूर्वी गेलेला होता. शुक्रवारी (दि.22) दुपारी तो ऊस तोडणी करत असलेल्या शेतातील जवळच्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पाय घसरून पडला. यातच त्याला आपला जीव गमवावा लागला.
त्याच्या सोबत गावातील पदमाकर माणिक पारवे हे ऊस तोडणी साठी गेलेले आहेत. त्यांनी गांजपूर येथे या घटनेची माहीती दिली. त्याच्या पश्चात पत्नी आई असा परिवार आहे. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. गरीब कुटुंबातील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गांजपूर येथे दुपारी त्यांचे पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.