BEED24

धारुरचे कोविड केअर सेंटर उद्यापासून होणार सुरु;

किल्लेधारूर  दि.1 एप्रिल – जिल्ह्यात मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना विषाणूचे (Corona virus) संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात बंद करण्यात आलेली आठ ठिकाणची कोविड केअर सेंटर दि.30 मार्चपासून सुरु करण्यात आली. यात 74 ॲक्टीव रुग्ण असणाऱ्या धारुरचा समावेश नसल्याचे बीड24 न्यूज पोर्टल मधून निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत उद्या दि.2 एप्रिलपासून कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.

(Dharur’s Covid care Center to start from tomorrow;)

जिल्ह्यात एकुण 15 कोविड केअर सेंटर (Covid care center) सुरु करण्यात आलेली आहेत. मात्र दि.19 ते 29 मार्च दरम्यान 74 ॲक्टीव रुग्ण असणाऱ्या धारुर तालुक्यातील कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला नव्हता. याबाबत नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांच्याकडे माहिती मागितली असता प्रशासकीय पातळीवर काही ठराविक ठिकाणीच कोविड केअर सेंटर (Covid care center) सुरु करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळाली.

गतवर्षी धारुर येथील 100 खाटांचे कोविड सेंटरने जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा देवून रुग्णांची प्रशंसा मिळवली होती. परंतू नोव्हेंबर महिन्यात रुग्ण संख्या कमी झाल्याने अचानक येथील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. तीन महिन्यानंतर पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले असून धारुर तालुक्यात दहा दिवसांत 74 रुग्ण संख्या आढळून आली. हि बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून येथील कोविड सेंटर सुरु करणे गरजेचे असल्याचे बीड24 न्यूज पोर्टलने दाखवून दिले.

तहसील व आरोग्य प्रशासनाकडूनही सेंटर सुरु करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. नुकताच पुन्हा कोरोना विषाणूचा (Corona virus) संसर्ग वाढला आहे. धारुर तालुक्यातही कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा दररोज हलता आहे. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची सोय 40 कि.मी. लांब असलेल्या लोखंडी सावरगावला असल्याने गैरसोयीचे आहे. धारूर तालुक्याचा एकुण कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा हजारापर्यंत पोहोचला असून दि.19 पर्यंत मृतांचा आकडा 31 तर तालुक्याचा मृत्यू दर 3.46% येवढा होता. हि बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने 100 ऐवजी 40 बेड्सची मंजुरी काल दि.31 रोजीच्या निर्णयात दिली असून उद्यापासून हे कोविड सेंटर सुरु होणार आहे. अशी माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.

Exit mobile version