BEED24

धारुरचे कोविड सेंटर बंद; पहा दुसऱ्या लाटेतील तालुक्याची स्थिती.

किल्लेधारूर दि.2 सप्टेंबर – तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second wave of Corona) सुरु करण्यात आलेली कोविड केअर सेंटर (Covid care center) दि.1 सप्टेंबर पासून बंद करण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी दिली.

(Dharur’s Covid Center closed; See the condition of the taluka in the second wave.)

तालुक्यात दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव (Corona Outbreak) पाहता 2 एप्रिल 2021 पासून शहरातील कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. पहिल्या लाटेपेक्षा बाधितांची संख्या वाढल्याने 40 बेड वरुन 300 बेडपर्यंतची व्यवस्था आरोग्य विभागाकडून (Health Department) करण्यात आली होती. राज्यासह जिल्ह्यात दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याने हळूहळू वाढीव कोविड सेंटर बंद करण्यात आली.

दि.31 अॉगस्ट पर्यंत येथील समाजकल्याण विभागाचे मुलींच्या वस्तिगृहात सुरु असलेले कोविड सेंटर सुरु होते. मात्र दि.1 सप्टेंबर पासून सदरचे कोविड सेंटर बंद करण्यात आले असून आता तालुक्यातील कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची व्यवस्था केज तालुक्यातील पिसेगाव येथील कोविड सेंटरवर करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी (Taluka Health Officer) डॉ. शहाजी लोमटे यांनी दिली आहे.

दुसऱ्या लाटेत धारुर कोविड सेंटर….
दि.03/04/2021 ते 01/09/2021
एकुण दाखल बाधितांची संख्या- 2271
बरे होईन घरी गेलेले – 1605
उपचारासाठी हलवलेले- 405
गृह विलगीकरण – 261
मृत्यू 0

 

Exit mobile version