BEED24

धारुरच्या सुपुत्राचे रोहा जि.रायगड येथे अपघाती निधन;

किल्लेधारूर दि.24 मे – धारूरचे भूमिपुत्र भगवान बिरोबा शेळके (50) यांचे रविवारी 23 मे रोजी रायगड जिल्ह्यात रोहा येथे अपघाती निधन झाले. धारूर (Dharur) येथे आज सोमवारी रात्री त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
(Dharur’s son dies in accident at Roha, Raigad;)

धारूर येथील रहिवाशी सध्या महावितरण (Mahavitaran) मध्ये अतिरीक्त कार्यकारी अभियंता पदावर रोहा जि. रायगड येथे कार्यरत असणारे भगवान बिरोबा शेळके यांचे रोहा येथे अपघातात (Accident) रविवारी निधन झाले. शेळके यांचा धारुर येथील अत्यंत गरीब मेंढपाळ कुटूंबात जन्म झाला.

हलाखीच्या परिस्थितीवर मात करत त्यांनी आपले शालेय शिक्षण धारुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पुर्ण केले. अत्यंत तल्लख बुध्दीमत्ताच्या जोरावर त्यांनी औरंगाबाद येथे शासकीय अभियांत्रिकी (Engineering) महाविद्यालयात अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण पुर्ण केले. स्वतः शिक्षण घेत असताना लहान बंधू यांस वैद्यकीय शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

वर्ष 1997 मध्ये महाराष्ट्र राज्य विज मंडळात कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाले. सध्या ते रोहा जि. रायगड येथे महावितरणमध्ये (Mahavitaran) अतिरीक्त कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. काल रविवारी दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात (Accident) होवून यातच त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या पार्थीवावर आज सोमवारी दि.24 मे रोजी धारूर (Dharur) येथे रात्री अंत्यसंस्कार  करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे रोहा व किल्लेधारूर नगरीत हळहळ व्यक्त केली जात आहे. ते नेत्र तज्ञ  डॉ.एकनाथ शेळके यांचे बंधू  होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Exit mobile version