बीड दि.7 एप्रिल – जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 716 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. काल 361 जणांनी कोरोनावर मात करत उपचार घेवून घरी परतले आहेत. काही दिवसांपुर्वी धारुर येथील एका तरुणाचा पुण्यात कोरोनामुळे निधन झाले आहे. जिल्ह्यात वाढलेला कोरोना विषाणू (Corona virus) संसर्ग, दिवसागणिक वाढणारे हे आकडे चिंताजनक असून याकडे गांभीर्याने पाहण्याची व नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले आहे.
(Dharur’s youth dies by corona in Pune; Who are the victims of the 10 corona scams that took place on Tuesday? Guardian Minister Dhananjay Munde expressed concern.)
कालचा दिवस बीड जिल्ह्यासाठी चिंताजनक ठरला आहे. काल अवघ्या महाराष्ट्राने अंबाजोगाईत एकाच चितेवर आठ जणांचा अंत्यविधी पाहून हळहळ व्यक्त केली. एकाच दिवसात तब्बल 716 नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) तर 10 कोराेना मृत्यूची नोंद झाली. मृतांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील 60 वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील 54 वर्षीय महिला, परळी तालुक्यातील नागापूर येथील 60 वर्षिय पुरुष, जलालपूर भागातील 35 वर्षिय पुरुष, परळी शहरातीलच 48 वर्षिय पुरुष, बीड शहरातील मोमीनपुरा 58 वर्षिय पुरुष, धानोरा रोड परिसरातील 79 वर्षिय पुरुष, पेठबीडमधील 55 वर्षिय पुरुष, माजलगाव तालुक्यातील उमरी येथील 65 वर्षिय महिला, शहरातील शाहुनगर भागातील 68 वर्षिय पुरुषाचा समावेश आहे. काही दिवसांपुर्वी धारुर शहरातील एका 32 वर्षीय तरुणाचा पुण्यात कोरोनावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.
दररोज वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक- धनंजय मुंडे
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून, मंगळवारी एकाच दिवसात हे आकडे 700 च्या पार गेलेले पाहायला मिळाले. दिवसागणिक वाढणारे हे आकडे चिंताजनक असून याकडे गांभीर्याने पाहण्याची व नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू (Corona virus) संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकरात लसीकरण करून घ्यावे; ज्यांनी लसीचे पहिले डोस घेऊन विहित वेळ पूर्ण केली आहे, त्यांनी लसीचे दुसरे डोस घ्यावेत असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची आकडेवारी मोठ्या वेगाने वाढत आहे. ही रुग्णासंख्या विचारात घेतली असता ऑक्सिजन/व्हेंटिलेटर्स उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन सिलिंडर याची कमतरता भासणार नाही, यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. परंतु या सगळ्या प्रयत्नांना जिल्ह्याच्या जनतेने नियमांचे पालन करून व आवश्यक काळजी घेऊन सहकार्य करणे व प्रशासनास पाठबळ देणे आवश्यक असल्याचेही ना. मुंडे यांनी म्हटले आहे.
सर्वत्र आरोग्य दूत आपले प्राण पणाला लावून कोरोना परिस्थितीशी लढा देत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, तसेच पात्र असलेल्या सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना केले आहे.