BEED24

पुरातत्व खात्यात चाललं काय…? मराठवाड्यात बोगस कामांचे पितळ उघडे

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) येथील किल्ल्यातील Fort Dharur नवीन बांधलेल्या भिंती कोसळण्या पाठोपाठ बीड Beed जिल्ह्यातील पाटोदा येथील मंदीर व उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर मधील संत गोरोबा काका यांच्या घरात नव्याने केलेल्या कामाची पडझड झाल्याचे समोर आले आहे. यामुळे औरंगाबाद Aurangabad येथील पुरातत्व खात्याच्या सहाय्यक संचालक विभागात चालले काय असा प्रश्न पडत असून बोगस कामांचे पितळ उघडे पडत आहे.

गड, किल्ले संवर्धनासह सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. बीड Beed जिल्ह्यातील धारुर Fort Dharur किल्ल्यासाठी जवळजवळ ७ कोटी रुपये खर्च करण्यात येवून पडलेल्या जून्या भिंती नव्याने उभारण्यात आल्या. मात्र यातील तीन भिंती ढासळल्या. बीड Beed जिल्ह्यातीलच पाटोदा येथील प्राचिन संगमेश्वर मंदीरात पुरातत्व archeology खात्याने १ कोटीपेक्षा जास्त खर्च केला. या नवीन काम गेल्याच महिन्यात जमीनदोस्त झाले. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील संत गोरोबा काका यांच्या घराची दुरुस्तीही पुरातत्व खात्याने केली होती. या कामावरही जवळपास १ कोटी खर्च करण्यात आला आहे. सदरील घराचीही दोन दिवसांपुर्वी पडझड झाली आहे. यामुळे औरंगाबाद  Auranbad पुरातत्व archeology खात्याने केलेली कामे ही दर्जाहीन असल्याचे सिध्द होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामे करण्यात आली असुन मराठवाड्यात मात्र पडझड होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होण्याची गरज असुन शेकडो वर्षाच्या वास्तू संवर्धनाची जबाबदारी असलेल्या संबंधित यंत्रणेतील दोषींवर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Did the archeology account ...? The brass of bogus works open in Marathwada
Exit mobile version