BEED24

सर्व मतभेद विसरून डिजिटल मीडिया पत्रकारांनी एकत्र यावे-अद्वैत चव्हाण

सर्व मतभेद विसरून डिजिटल मीडिया पत्रकारांनी एकत्र यावे-अद्वैत चव्हाण

अमरावती दि.२८- सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने लोकांनासुद्धा बातम्या वाचण्यासाठी आता डिजिटल मीडियाची सोबत लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडिया digital media  मध्ये कार्यरत असणारे पत्रकार journalists मंडळी स्वतःच्या वेबपोर्टल, न्युज वेबसाईट, ब्लॉग, युट्युब चॅनेल च्या माध्यमातून बातम्या लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवत असतात. डिजिटल मीडिया मध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकारांनी journalists एकत्र येण्याचे आवाहन ॲडमिन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. अद्वैत चव्हाण aadvaith chavan यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये हजारो पत्रकार डिजिटल मेडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहितीचा खजिना पोहोचवण्याचे काम करत आहेत. कोरोना सारख्या महामारी काळामध्ये डिजिटल मीडियाने digital media  अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून सातत्याने लोकांना जागरूक करण्याचे काम केलेले आहे. या काळामध्ये प्रिंट मीडिया चे छपाई आणि वितरण बंद असल्याने या सर्व घडामोडी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवला गेले. नैसर्गिक आपत्तीत जसे की चक्रीवादळ महापूर आणि इतर सर्व नैसर्गिक आपत्तीमध्ये डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी journalists अतिशय महत्त्वपूर्ण काम करून लोकांपर्यंत जलद माहिती पुरवण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारने सुद्धा 16 ऑक्टोबर रोजी एक विशेष प्रेस रिलीज करून भविष्यामध्ये डिजिटल मीडियाच्या digital media  पत्रकारांना journalists सुद्धा मेंस्ट्रीम मीडिया म्हणजेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांसाठी असलेल्या सर्व सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांमध्ये journalists आनंदाचे वातावरण असून याच वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम काही लोक करत आहेत. मात्र या सर्व लोकांकडे दुर्लक्ष करून तसेच आपापसातील मतभेद विसरून डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांनी journalists एकत्र येण्याचे आवाहन आता महाराष्ट्र डिजिटल मीडिया पब्लिशर्स यांनी केले आहे. महाराष्ट्रातील सर्व डिजिटल मीडिया digital media  मध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन डिजिटल मेडियातील अग्रणी असलेल्या ॲडमीन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. अद्वैत चव्हाण aadvaith chavan यांनी केले आहे.

Exit mobile version