बीड दि.11 अॉगस्ट – बीड जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, गेवराई व शिरुर कासार या तालुक्यात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी दि.19 जुलै पासून ते 28 जुलै पर्यंत या तालुक्यात शहर व ग्रामीण भागात कडक निर्बंध (restrictions) लावण्याचे आदेश दि.17 ते 28 जुलैपर्यंतसाठी काढले होते. सदरील आदेश 28 जुलैपासून पुढेही कायम ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दि.10 अॉगस्ट मंगळवारी रात्री नवीन मार्गदर्शक सुचना (guidelines) जाहिर करत निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत. आता या चार तालुक्यातील सर्व आस्थापना आज दि.11 अॉगस्टपासून सांयकाळी 4 पर्यंत उघडे ठेवण्याची मुभा असणार आहे.
(District Collector’s new order regarding restrictions in Beed district … see what are the orders.)
जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई व शिरुर कासार तालुक्यात कोवीड -19 विषाणूचा (corona virus) प्रार्दुभाव वाढला होता. कोविडच्या तिसऱ्या लाटेची (Third wave of corona) संभाव्यता लक्षात घेता संभाव्य रुग्ण संख्या व उपलब्ध वैद्यकीय संसाधनांचा विचार करता रुग्ण संख्या नियंत्रित करणे हे अत्यंत आवश्यक होते. त्या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दि.17 जुलै रोजी आदेश काढत नवीन मार्गदर्शक सुचना (Guidelines) दिल्या होत्या. सदर आदेशाची अंमलबजावणी सोमवार दि.19 जुलै पासून सुरु होवून ती दि.10 अॉगस्ट पर्यंत वाढवण्यात आली होती. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या नवीन आदेशानूसार आता निर्बंधात शिथिलता मिळणार आहे.
अशा आहेत नवीन मार्गदर्शक सुचना.
1. बीड जिल्हयातील आष्टी, पाटोदा, गवराई व शिरुर कासार तालुक्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात अत्यावश्यक सेवांच्या (essential services) पुरवठा संबधित आस्थापना उघडण्याचा कालावधी प्रत्येक दिवशी सोमवार ते रविवार सकाळी 07.00 ते दुपारी 4 वा . पर्यंत असेल.
2.वरील तालुक्यांमध्ये ग्रामीण व शहरी भागात सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना उघडण्याचा कालावधी ( सोमवार ते शुक्रवार ) सकाळी 07.00 ते दुपारी 4 वा . पर्यंत असेल. शनिवार व रविवार या दिवशी आवश्यक सेवांच्या पुरवठा संबधित आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना पुर्ण पणे बंद राहतील.
3. वरील तालुक्यांमधील सर्व आस्थापनां पैकी जसे की हॉटेल्स, रेस्टॉरंट, ई – कॉमर्स सेवा , व्यायामशाळा , सलून , ब्युटी पार्लर इ . आस्थापनाधारकांना या कार्यालयाचे आदेश 05.06.2021 मधील नमुद निर्बंध वरील कालावधीमध्ये लागु राहतील.
4. वरील तालुक्यांमध्ये सकाळी 07.00 वा . ते दुपारी 4 वाजेपर्यंतची आस्थापना सुरु ठेवण्याची सुधारित वेळ लक्षात घेता , दुपारी 4 वाजेनंतर केवळ अत्यावश्क कारणांव्यतिरिक्त ( उदा . परगावी प्रवास , वैद्यकीय सेवा इ . ) हालचाल व शहरातर्गत अथवा गावांतर्गत प्रवासास परवानगी असणार नाही .
5. उक्त वेळे व्यतिरिक्त बिना कारण घराबाहेर पडल्याचे निर्दशनास आल्यास , संबंधिता विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही अनुसरण्यात येईल .
6. संबंधित कायक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी , तहसिलदार , उप विभागीय पोलीस अधिकारी , मुख्याधिकारी नगर पालिका / नगर पंचायत, पोलीस निरिक्षक स्थानिक पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सदरील आदेशाची अंमलबजावणी काटेकोर पणे पुर्ण करावी
7. शहरांमधील विशिष्ट ठिकाणी अथवा विशिष्ट गाव / वाडी ठिकाणी मोठया प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याचे निर्दशनास आल्यास अशी शहरी भागांमधील ठिकाणे / गावे / वाडी कंटेन्मेंट झोन ( Containment Zone ) घोषित करण्याबाबतची दक्षता स्थानिक अधिकारी यांनी घ्यावी तसेच ( Containment Zone ) ची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने स्थानिक कर्मचारी यांनी कार्य करावे , क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी याबाबत स्थळ पाहणी करावी .
8. सद्यस्थितीत जिल्हयात कोवीड -19 बाधित असलेल्या रुग्णांकरिता गृह विलगीकरण (Home lsolation) 2 परवानगी पुर्णत : बंद असल्याने ज्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या / कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड बा रुग्ण गृह विलगीकरणात आढळून येतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीप्रमाण कार्यवाही अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी .
9. बाजारपेठांमध्ये विना मास्क फिरणारे नागरिक तसेच विहित कालावधी नंतरही आस्थापना सुरु ठेवणारे व्यवसायिक यांच्यावर दंडात्मक कार्यवाही अनुसरण्यात यावी जेणेकरुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे पुर्ण होईल .
10. शनिवार रविवार या दिवसांमध्ये आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना सुरु राहणार नाहीत याची दक्षता सर्व तहसिलदार यांनी घ्यावी या करिता कार्यक्षेत्रातील उप विभागीय पोलीस अधिकारी , मुख्याधिकारी , नगर पालिका / नगर पंचायत व गट विकास अधिकारी यांच्या सोबत रोज आढावा घ्यावा आणि सर्व तहसिलदार यांनी याबाबत सर्व संबंधित विभागासोबत समन्वय ठेवुन कामकाज करावे . दंडात्मक कार्यवाही प्राधान्याने आणि परिणामकारक असावी .
11. निर्बधांचा कालावधी लक्षात घेता . नियंत्रक अधिकारी यांनी शेती विषयक कामे व पीक कर्ज विषयक कामे बाधित होणार नाहीत याबाबत दक्षता घेवुन विवेकाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे .
12. सदर आदेशानुसार करण्यात आलेले बदल हे औद्योगिक क्षेत्रास प्रभावित करणार नाहीत . उद्योगांना यापुर्वीच्या वेळोवेळी निर्गमित्त आदेशांमधील नियम व निबंध पुर्वीप्रमाणे लागू राहतील .
13. जिल्हयातील इतर तालुक्यांमधील क्षेत्रीय अधिकारी यांनी देखील सद्यस्थितीत त्यांच्या तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी, गाफिल न राहता या कार्यालयाचे वेळोवेळी प्रदान करण्यात आलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे असे आदेश देण्यात आले आहेत.