BEED24

Dr. Babasaheb Ambedkar आरणवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष ; गावकऱ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद.

किल्लेधारुर दि.2 मे – भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त धारूर तालुक्यातील आरणवाडी गावात रविवारी (दि.30) सायंकाळी उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकींमध्ये दांडिया, पारंपारिक नृत्य, लेझीम पथकाच्या सादरीकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या महोत्सवात गावकऱ्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

( Aranwadi Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebration; Enthusiastic response from the villagers. )

आरणवाडी गावात मागील 35 वर्षांपासून 30 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. रविवारी सकाळी आठ वाजताच सरपंच भागवत शिनगारे, उपसरपंच मिथून मस्के, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश काेकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून मिरवणूकीला सुरुवात झाली. या मिरवणूकीमध्ये शिक्षक ए.आर. वाघमारे, सांस्कृतिक प्रमुख आकाश मस्के यांनी तयार केलेला सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरिकरण झाले. यामध्ये भिमगितांवर दांडीया, लेझीम व नृत्यांचे सादरिकरण केले. यामध्ये आयुषी मस्के, पंकजा मस्के, स्वरा मस्के, श्रृती मोरे, अनन्या तांगडे, प्रतिक्षा मस्के, प्राजक्ता मस्के, योगिनी मस्के, मोहिनी मस्के, तेजस्विनी मस्के, तृप्ती मस्के, आकांक्षा मस्के, प्रिती मस्के, कामिनी मस्के, विरा मस्के, आदित्य मस्के, अनिकेत मस्के, आदेश मस्के, विराज मस्के, राजरतन मस्के, सुप्रिम मस्के, अजय मस्के या विद्यार्थ्यांनी दांडिया, लेझीम आणि नृत्याचे सादरिकरण केले. हा सोहळ्या गावकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असाच ठरला. या जयंतीसाठी शिक्षक अंकुश मस्के, आकाश मस्के, उपसरपंच मिथून मस्के, गणेश मस्के, दयानंद मस्के, विशाल डोंगरे, दीपक मस्के यांनी परिश्रम घेतले. भिमगितांचा रंगला कार्यक्रम 30 एप्रिलच्या पुर्वसंध्येला आरणवाडीतील समाजिक सभागृहात भिमगीतांचा कार्यक्रम जोरदार रंगला. यात गायकांनी एकाहुन एक अशी सरस गितांचे सादरिकण करीत सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.

Exit mobile version