BEED24

बीडचे सुपुत्र डॉ.शिवरत्न शेटे केंद्रीय आयुष समितीवर

माजलगाव:दि.१६(प्रतिनिधी) किल्लेभ्रमंती आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या व्याख्यानाद्वारे प्रभावीपणे मांडणारे दिंद्रुडचे भुमीपुत्र डॉ.शिवरत्न शेटे यांची केंद्रीय आयुषवर नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचे ज्येष्ठ बंधू असलेले डॉ. शिवरत्न नक्कीच दिल्लीतही बीडचा प्रभाव पाडतील यात शंका नाही. बीडच्या सुपुत्राची दिल्लीत आयुषवर नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. शेटे यांचे अभिनंदन होत आहे.

आयुर्वेद शास्त्रातील योगदान आणि त्या ज्ञानाचा देशातील आरोग्यासाठी धोरणात्मक उपयोग व्हावा याकरिता केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी भारत सरकारच्या आयुष AYUSH मंत्रालया अंतर्गत नुकतीच संपूर्ण देशातून चार आयुर्वेद तज्ज्ञांना नाम निर्देशित केले. यात पद्मभूषण डॉ.त्रिवेदी, डॉ.डोईफोडे, डॉ.पद्मा श्रीवास्तव आणि डॉ.शिवरत्न शेटे (Dr. Shivratna Shete) यांचा समावेश आहे. आयुर्वेद ही दुष्परिणाम रहित भारतीय चिकित्सा पद्धती असल्याने स्वतंत्र आयुष मंत्रालय आणि स्वतंत्र केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी अथक मेहनत घेऊन आयुर्वेद शास्त्रास राजाश्रय देऊन न्याय दिला आहे. आयुर्वेद शास्त्राची सेवा देशाची राजधानी दिल्लीत करण्याची संधी या आयुष AYUSH नियुक्ती मुळे डॉ.शेटे यांना प्राप्त झाली आहे. सर्वांना अभिमान वाटेल अशीच सार्थ कामगिरी करणार असे डॉ शिवरत्न शेटे (Dr. Shivratna Shete) यांनी यावेळी सांगितले. किल्लेभ्रमंती आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या व्याख्यानाद्वारे महाराष्ट्रभर ओजस्वी वक्तृत्वाने गाजविणाऱ्या आणि हिंदवी परिवाराच्या गड भ्रमंती मोहिमांच्या माध्यमातून आजवर लाखों आचरणकर्ते शिवभक्त घडवून राष्ट्रबांधणी करणाऱ्या डॉ. शेटे यांची केंद्रीय पातळीवर दखल घेतल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

#Dr. Shivratna Shete, #AYUSH

Dr. Shivaratna Shete on the Central AYUSH Committe
Exit mobile version