BEED24

बीडमध्ये पहाटे आगीचे तांडव….

बीडः दि.९- आज पहाटे ३ ते ३.३० च्या सुमारास बीड Beed LIC येथील एलआयसी कार्यालय भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे आढळून आले असुन कार्यालय पुर्णतंः जळून भस्म झाले आहे.

बीड जिल्ह्यातील एक अग्रगण्य भारतीय जीवन बिमा निगमचे Beed LIC जिल्हा कार्यालय नगर रोडवर आहे. पहाटे ३ च्या सुमारास आगीच्या ज्वालामुळे आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. सदरील आग भारतीय जीवन बिमा निगमच्या जीवन ज्योती या कार्यालयास असल्याचे लक्षात आले. या आगीत कार्यालयातील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आगीत जीवित व वित्तीय हानी किती झाली याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही. आग अत्यंत भयानक लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Exit mobile version