BEED24

आठ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; धारुरमध्ये सोलापूर ची पुनरावृत्ती

किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) येथील बस ST आगारातील मुंबईहून आलेल्या २८ कर्मचाऱ्यांची आज दि.९ रोजी सकाळी ११ पर्यंत ॲन्टीजन Antigen तपासणी करण्यात आली असुन यात ८ जन पॉझिटीव्ह positive  आढळली आहेत. एकुण पन्नास जनांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. कोरोना corona काळात परप्रांतिय मजुरांना गावापर्यंत सोडणार कर्मचारी राज्यातल्या सेवेत कोरोना corona बाधित होत असल्याचे  दिसत आहे .

महामंडळाकडून सध्या अनेक आगारातील ST बसेस व कर्मचारी मुंबईत सेवा देत आहेत. धारुर आगारातून सध्या मुंबईच्या सांताक्रुझ व बांद्रा भागात ११ बसेस व ४४ चालक व वाहक पाठवण्यात आली आहेत. आठ दिवस काम करुन सदरील ४४ कर्मचारी परतली असुन त्यांची व त्यांच्या संपर्कातील अशा एकुण ५० जनांची कोविड-१९ ची ॲन्टीजन Antigen तपासणी येथील कोविड सेंटरवर करण्यात येत आहे. सकाळी अकरा पर्यंत २८ कर्मचाऱ्यांची तपासणी झाली असुन यात ८ जन पॉझिटीव्ह Positive आली आहेत. गेल्याच आठवड्यात सोलापूर Solapur आगारातील १४४ पैकी ८१ कर्मचारी मुंबईहून Mumbai परतल्यानंतर पॉझिटीव्ह आले होते. धारुरातही Dharur याची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसत आहे. आणखी २२ जनांची तपासणी होणे असून या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आगार प्रमुख जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. कर्मचाऱ्यांसाठी कसलीही सुविधा उपलब्ध करुन दिल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version