BEED24

बीड जिल्हा नियोजन समितीवर आ.सोळंके, आ.आजबेसह 15 सदस्यांच्या निवडी

बीड दि.17 मार्च – बीड जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यातून आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) व आ. बाळासाहेब आजबे (Balasaheb Aajbe) यांची तर जिल्हा नियोजन समितीचा (Beed District Planning Committee) अनुभव असलेल्या दोन सदस्यात वाल्मिक कराड व अभयकुमार ठक्कर यांची व इतर 11 नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

(Election of 15 members including MLA Solanke and MLA Ajbe on Beed District Planning Committee)

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज जिल्हा नियोजन समितीच्या (Beed District Planning Committee) विशेष नामनिर्देशित सदस्यांची नावे जाहिर करण्यात आली आहे. यात विधिमंडळ सदस्यातील दोघांची ज्यात माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) व आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Aajbe) यांची निवड करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याचा अनुभव असणाऱ्या दोन सदस्यात वाल्मिक कराड व अभयकुमार ठक्कर यांची निवड झाली आहे.

विशेष निमंत्रित सदस्य म्हणून 11 जणांची निवड झाली आहे. यात बाबुराव पोटभरे, शेख समशेर शेख शब्बीर, सयाजी शिंदे, विठ्ठल सानप, राजेंद्र लोमटे, सुनिल वाघाळकर, महादेव धांडे, दादासाहेब मुंडे, सचिन मुळूक, अनिल जगताप व वैजेनाथ सोळंके यांचा समावेश आहे.

नवनिर्वाचित नियोजन समितीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांना स्थान देण्यात आलेले आहे. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेससह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.

Exit mobile version