BEED24

elections… धारुर तालुक्यातील 20 ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले.

किल्लेधारुर दि.5 अॉक्टोंबर – elections… धारुर Dharur तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून यात दोन नवीन ग्रामपंचायतची पहिली निवडणूक होत आहे.( elections… 20 gram panchayat elections in Dharur taluka have been announced.)

महाराष्ट्रात एकुण 2361 ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचा gram panchayat elections कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला. यात बीड Beed जिल्ह्यातील 180 ग्राम पंचायतीचा समावेश आहे. यामुळे धारुर Dharur तालुक्यातील 20 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्राम पंचायतीत काटेवाडी, थेटेगव्हाण, चिखली, हिंगणी बु., हिंगणी खु. मोहखेड, व्हरकटवाडी, सुरनरवाडी, सिंगणवाडी, धुनकवड, भोगलवाडी, सोनिमोहा, पिंपरवाडा, गोपाळपुर, मोरफळी या गावांचा समावेश आहे.

Exit mobile version