मुंबई दि.23 अॉक्टोंबर – आता प्राथमिक शाळाही लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले आहेत. राज्यातील इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) सकारात्मक आहेत. पुन्हा शाळा सुरू करण्यावर जोर असल्याचं दिसत आहे.
(Elementary school also signals to start soon; Review by Varsha Gaikwad.)
दरम्यान, मुख्यमंत्री, मंत्रीमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत (Task Force) चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, वर्षा गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली. या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा, त्याअनुषंगाने तयारी, लसीकरण आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला.
या बैठकीत जवळपास सगळ्याच जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, राज्यात 4 ऑक्टोबरला तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या. राज्यभरात या निमित्तानं शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. यात 5 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत.
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, प्रत्येक जिल्ह्यात आदर्श शाळा योजनेची आणि संबंधित जिल्ह्यांमध्ये निजामकालीन शाळांच्या विकासाच्या कामांची अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागातील शाळांच्या देखभालीचा निधी वितरीत करण्यात येईल. कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण (vacccination) पूर्ण करण्यात यावे, काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यास सहकार्य करण्यात येईल. शाळा दुरूस्तीसाठी नियोजन आवश्यक असून, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निधी उभा करावा. जिल्ह्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती त्वरीत सादर करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.