BEED24

वर्ष अखेरी कार कंटेनरचा भीषण अपघात; चौघे जागीच ठार, दोन गंभीर.

उस्मानाबाद दि.31 डिसेंबर – लातूर बार्शी राज्य महामार्गावर कार – कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघात (Accident) चार जण जागीच ठार झालेत. तर दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(End of year .. car container horrific accident; Four were killed on the spot and two were seriously injured.)

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 10 कि.मी. अंतरावर आळणी फाटा येथे लातूर (Latur) उस्मानाबाद बार्शी (Barshi) या महामार्गावर (Highway) ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटनेरला भरधाव कारची जोरदार धडक बसली. कार लातूरकडे जात होती. यावेळी हा अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झालेत.

अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमीनां उस्मानाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात मृत पावलेल्या सर्व व्यक्ती लातूर (Latur) जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, कार (एमएच 24 ए ए 8055) कंटेनरच्या खाली घुसून कारचा चेंदामेंदा झाला आहे. त्यावरुन अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच उस्मानाबाद (Osmanabad) पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्यासाठी धावले आहेत. या अपघाताचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) सलग रस्ते अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. कालच औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात भीषण अपघात झाला होता. ज्यात सहा तर परवा हिंगोली येथे झालेल्या अपघातात चार जण दगावले होते. यांनतर आज उस्मानाबादमध्ये या अपघाताची घटना घडून आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी चौघांनी जीव गमावला आहे.

 

Exit mobile version