BEED24

अखेर ‘ती’ महिला वाहतूक पोलिस निलंबित

पिंपरी: दि.१८- दुचाकीस्वार महिलेकडून लाच घेताना मोबाईलच्या (Mobile) कॅमेऱ्यात बंद झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील महिला वाहतूक पोलिसाचा प्रताप सोशल मेडियात (social media) चांगलाच गाजला. सोशल मिडियात व्हायरल झालेली ही क्लिप पोलिस (Police) आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यापर्यंत गेल्याने या महिलेच्या निलंबनाचे (suspend) आदेश लगेचच काढण्यात आले. यामुळे पोलिस दलात आज खळबळ उडाली.

सहाय्यक पोलिस (Police) आयुक्त श्रीकांत दिसले यांनी ही महिला कर्तव्यात असलेल्या पिंपरी वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षकांकडून घटनेचा अहवाल मागून घेतला होता. त्याआधारे पोलिस उपायुक्तांनी तातडीने निलंबनाची (suspend) कारवाई केली. स्वाती सोन्नर असे या महिला पोलिसाचे नाव आहे. शहराच्या बाजारपेठेत पिंपरी कॅम्पात नो एंट्रीत घुसलेल्या डबलसीट महिला दुचाकीस्वाराकडून डिजीटल पद्धतीने दंड आकारण्याऐवजी या महिला पोलिसाने सदर तरुणीला आपल्या पँन्टच्या मागील खिशात लाचेची रक्कम ठेवण्यास सांगून ती स्विकारली होती. सदरील सर्व प्रकार एकाने मोबाईल (Mobile) मध्ये चित्रित करुन सोशल माध्यमावर (social media) वायरल केला होता.

Exit mobile version