बीड दि.16 जानेवारी – दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परळी तालुक्यातील सत्तर वर्षीय वृध्दाचे शीर तुटलेल्या अवस्थेतले धड आढळून आल्याने, बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) तालुक्यातील हिवरा गोवर्धन गावात खळबळ उडाली आहे.
(Excitement in Beed district; Missing person’s body found …)
मारुती नामदेव उगले (वय 70) रा.हिवरा गोवर्धन ता. परळी असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. 13 जानेवारीपासून मारुती उगले हे बेपत्ता होते. घरातील व्यक्तींसह नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. मात्र ते दिसुन आले नाहीत.
काल सायंकाळी उशिरा उगले वस्ती जवळील त्यांच्या शेतातचं त्यांचे शीर तुटलेल्या अवस्थेतले प्रेत एका व्यक्तीच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती सिरसाळा पोलीसांना समजताच पोलीस निरीक्षक (Policd Inspector) प्रदीप एकशिंगे घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळाची पहाणी केली. मृतदेह रात्री अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात (SRTR) शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी मयताचे मुंडके शोधून देखील पोलीस प्रशासनास ते सापडले नाही.
त्यामुळे हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा घात आहे की अपघात? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शवविच्छेदनानंतर याबाबत खुलासा स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेची सिरसाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे.