मुंबई दि. 4 एप्रिल – प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री (Actress) शशिकला जावळकर (Shashikala) यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. आज दि.4 एप्रिल रविवारी दुपारी 12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तब्बल दोन दशकं त्यांनी गाजवली आहेत. मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत.
(Famous Bollywood actress Shashikala passes away)
शशिकला (Shashikala) यांनी100 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शशिकला यांच्या निधनामुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत (Bollywood Cineworld) शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शशिकला या बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री (Actress) म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी साकारलेल्या खलनायिका उच्च अभिनित असून चिरस्मरणात राहणाऱ्या आहेत.
बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं आहे. प्रामुख्यानं त्यांचे ‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. 2005 पर्यंत त्या सिनेसृष्टीत कार्यरत होत्या. परंतु पुढे वाढत्या वयामुळं त्यांनी अभिनयातून निवृत्ती स्विकारली.
शशिकला यांनी साकारलेल्या सासु व आईच्या भुमिकेमुळे त्यांना एक नवीन ओळख मिळाली होती. त्यांच्या निधनामुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत (Bollywood Cineworld) शोककळा पसरली आहे. जगभरातील अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.