किल्लेधारूर दि.9 मे – देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजला आहे. कोरोना संसर्गातून अत्यंत जवळची माणसं जात आहेत. राज्यात दररोज शेकडो कोरोना बळींची (Corona Death) नोंद होत आहे. बळींच्या संख्या लपवली जात असल्याचाही आरोप होत आहे. कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आज धारुर (Dharur) तालुक्यातही काही घटना समोर आल्या आहेत.
(Fear does not end here …. Sarpanch of Chondi Babarai Munde and two others died.)
चौंडीचे सरपंच बाबाराया मुंडे यांचे निधन …
धारुर (Dharur) तालूक्यातील चोंडी येथील सरपंच बाबाराया वैजनाथ मुंडे (40) वर्ष यांचे कोरोना (Corona Infection) मुळे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या वर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. ते घागरवाडा व चोंडी सेवा सहकारी सोसायटी चे सचिव म्हणूनही काम पाहत होते. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.
वरिष्ठ लिपीक नितिन लतिबे यांचे निधन …
धारूर येथील एस टी आगारातील वरीष्ठ लिपीक नितिन लतीबे (32) वर्ष यांचे कोरोना आजाराने (Corona Infection) रविवारी सकाळी निधन झाले. गेल्या दहा वर्षा पासून वरिष्ठ लिपीक म्हणून ते एस.टी. महामंडळात कार्यरत होते. नितिन लतीबे यांना शनिवारी सांयकाळी कोरोनाचे लक्षणे आढळल्याने चिखलबीड येथून बीड येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सर्व नियमाचे पालन करत अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. नितिन लतीबे यांचा मनमिळावू प्रेमळ स्वभाव व सतत हसतमूख असे व्यक्तीमत्व असल्याने एस टी आगारात ते सर्व प्रिय होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
भोगलवाडीचे माजी उपसरपंच दता मुंडे…
तालुक्यातील भोगलवाडी काठेवाडीचे माजी उपसरपंच दत्ता मुंडे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. मागील महिनाभरापासून त्यांच्यावर बीड येथे उपचार सुरु होते. सध्या वडवणी येथे स्थायिक असलेल्या दत्ता मुंडे आपल्या हसतमुख व दिलदार स्वभावामुळे ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे भोगलवाडी, काठेवाडी व वडवणीत हळहळ व्यक्त होत आहे.