BEED24

अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद;

आष्टीः दि.५(प्रतिनिधी) अहमदनगर Ahemdnagar व बीड Beed जिल्ह्याच्या सिमेवर धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्यास Leopard जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असुन यामुळे परिसरातील जनतेची बिबट्याच्या दहशतीतून सुटका झाली.

नरभक्षक बिबट्याने अहमदनगर Ahemdnagar जिल्ह्यातील मढी, केळवंडी, करडवाडी या भागातील तीन बालकांचा जीव घेवून बीड Beed जिल्ह्यातील आष्टी Ashti तालुक्यात धुमाकूळ घातला होता. आष्टी व नगर वनविभागाने बिबट्यास Leopard जेरबंद करण्यासाठी दि.२६ आक्टोंबर रोजी पिंजरा लावला होता. मात्र गेल्या दहा दिवसांपासून बिबट Leopard फासात अडकत नसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. अखेर बुधवारी रात्री आष्टी Ashti तालुक्यातील सावरगाव शिवारात सटवाईचा माळ परिसरात भक्ष्याचा शोध घेणारा बिबट Leopard पिंजऱ्यात जेरबंद झाला.औरंगाबाद, अहमदनगर Ahemdnagar , नाशिक व बीड Beed वनविभागाचे कर्मचारी बिबट्यास जेरबंद करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नशील होते. बिबट्या जेरबंद होताच पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. आष्टी Ashti चे वनपरिक्षेत्र अधिकारी शाम सिरसट, अहमदनगर Ahemdnagar वनविभागाचे सहाय्यक वनरक्षक एफ.वाय. सोणवने व पथकाने विशेष प्रयत्न केले. बिबट्या जेरबंद झाल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र सिरसट यांना लोकांनी सतत सतर्क राहण्याचे आवाहन केले.

Exit mobile version