BEED24

परळीत अग्नी तांडव… खाजगी कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी

परळी वैजनाथः दि.२३(प्रतिनिधी) परळी (Parli) शहरातील इंडस्टेरिअल एरियात एका कुलर कंपनीत भीषण आग  (Fire) लागली आहे. सुमारे तासभरापासून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरु आहेत. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरात आगीचे व धुराचे लोळ आकाशात दिसत आहे. परळी (Parli) नगर परिषदेचे अग्निशमन दल आग  (Fire) आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

Exit mobile version